रंगांची उ ध ळ ण

Author: Rasika Mahabal / Labels: , , , , , , , ,



वॉटरकलरस कित्ती अनपेक्षित निकाल देणारे. पाण्याबरोबर मिसळून पेपरवर लावलेत की त्यांची चालच निराळी होते. ते कुठे जाऊन पसरतील काहीच सांगता येत नाही. म्हणुनच ते रंगवायला अवघड आणि पूर्ण झाल्यावर फलप्राप्तिची भावना देणारे.

अक्रेलिक - जिथे मारु तिथे बसतात आणि लगेच वाळून घट्ट होतात. एवढ सरळसोट त्यांच वागण तरीसुध्दा राजबिंडे दिसणारे. स्वतःकडे लक्ष आकर्षित करणारे.

ऑइल कलरस - थिक, दिवसेंदिवस वाळायच नाव घेत नाहित. दिसायला तर असतातच सुंदर पण त्याचबरोबर मला ते खुप ऍडजस्टिंग पण वाटतात, ते वाळेपर्यंत आणि वाळल्यावर सुध्दा त्याच्यावर पुटच्या पुट चढवू शकता.

चारकोल - जरा रस्टिक, गावराण दिसतात. थोडीशी ओबडधोबड गोष्टींची चित्र त्याला उठून दिसतात. रफ टेक्शर देऊन जाणारे हे स्मुथ रंग इतर चारकोल रंगांमधे मिक्स व्हायला चकार नकार देतात आणि प्रयत्न केला तर त्यांची नाराजी ते पेपरवर व्यक्त करतात.

जस प्रत्येक पेंटिंग प्रकाराच एक आगळेवेगळेपण आहे तसच प्रत्येक रंगाचसुध्दा आहे. प्रत्येक रंगाचे काही मित्र रंग असतात तर काही शत्रु. मित्र रंग एकमेकांच्या आजुबाजूला आलेत की एकदुसरयाच रुप अजुन निखारतात आणि शत्रु आजुबाजुला आलेत तर दुसरयाच दिसण तर खराब करतातच पण स्वतःचसुध्दा करतात.

एक चित्र सुंदर दिसण्याकरता निरनिराळे मित्र रंग आजुबाजुला येण गरजेच आहे. चित्रात नुसता एकच रंग असला तर निखार येत नाही. एकाच रंगांच्या वस्तुंनी व्यापलेल्या खोलीत प्रत्येक वस्तू स्वतःच अस्तित्त्व हरवते आणि आपल्या सारख्याच असणाऱ्या दुसऱ्या छटेत मिसळून जाते. अंगावर जर स्कायब्लू फ्रॉक आणि पायात फेंट पिवळे सॅंडल असतील तर दोघांच एक निराळ ठळक असणं असत.

कुठल्याही व्यक्तीचाच विचार करा ना. नुसतच कोणी का ब्लॅक ऍंड व्हाईट असतात? त्यांच्यात अनेक रंग असतात, त्या रंगांच्या विविध छटा वेगवेगळ्या वेळेस बाहेर येतात, कधी डार्क तर कधी फेंट.

आयुष्य ही रंगांची उधळण आहे, कुठल्याही रंगीबेरंगी चित्राहून ते कमी नाहीये. पांढरे डल क्षण आहेत म्हणून आपण निळ्या शांतदायी क्षणांना एंजॉय करतो, काळ्यासारख्या दुःखद घटना घडतात म्हणून आपण हिरव्या सुखाच्या घटकांची वाट बघतो.

कुठल्यातरी एकाच रंगाच माझ्या स्वभावावर अतिप्रभाव असू नये, कुठल्यातरी एकाच रंगाने माझ्या आयुष्याला रंगवू नये, काही घटना चारकोल सारख्या ओबडधोबड रस्टीक तर काही ऑईल सारख्या सुरेख आणि ऍडजस्टिंग, काही अक्रेलिक सारख्या रीलायबल ऍंड रिच तर काही वॉटरकलर सारखे बिनभरवशाचे आणि आव्हानात्मक दे अशी या दुनियेच्या किमयागार चित्रकाराकडे मी मागणी करते.

निसर्ग

Author: Rasika Mahabal / Labels: , , , ,



आपल्या मनाची जी परिस्थिती असते त्यावरुन आपल्याला निसर्गाची वेगवेगळी रुप आवडतात का? जस धबधब्याच कोसळणार रौद्र रुप बघून कधी मन शांत होत, त्याच ते रुप बघून डोळे भरुन येतात तर कधी त्याच तेच कोसळण भीषण वाटून मानसिक अशांती निर्माण करत.
कधी तळ्याची संथ चाल बघून एका प्रकारची अनामिक स्तब्धता मनास लाभते, झाडांच्या हिरव्या रंगाने प्रसन्नता मिळते तर कधी त्यांच्याकडे लक्षच जात नाही. हे निसर्गाच कॄर तर कधी निर्मळ स्वरुप आल्हाददायी तर कधी नैराश्यजनक का वाटाव?
नदीच खळखळणार पाणी - जे बघता येत पण त्यात मनसोक्त डुंबता येत नाही, हिरवेगार डोंगर दिसतात पण त्यावर लोळता येत नाही. निरभ्र निळ आकाश पण उडता येत नाही.
कधी जिवनाच्या 'हे सर्व का? कशासाठी' परिस्थितीतून जातांना अश्या कुठल्यातरी दैदिप्यमान निसर्गाच रुप दिसत आणि वाटत बर झाल मी आहे, हे सर्व खुप सुंदर आहे.