महाभारत

Author: Rasika Mahabal / Labels: , , ,




जर तुम्ही महाभारताच्या काळात जन्मलेला होता (म्हणजे बी. आर. चोप्राच्या) तर तुम्हाला पण आठवेल की दुरदर्शन वर महाभारत चालु झाल की रस्त्यावर सामसुम व्हायची. घरी टी.व्ही. नसलेले लोक टी. व्ही. च्या दुकानासमोर गर्दी करायचे. रामायण, महाभारताच्या काळातच सर्वात जास्त टी.व्हींचा खप झाला असावा. घरातली सर्व मंडळी हातातली काम सोडुन टीव्हीला चिकटुन बसायची. रविवार सकाळी उठल्यापासुन वाट बघण सुरु व्हायच ते अथ श्री महाभारत कथा अस गाण चालु झाल की मग जीव भांड्यात पडायचा. दुरदर्शनच्या महाभारताच्या वेळी मी खुपच लहान होते, तेव्हा मी फक्त बाणांचे युध्ध वगैरे गोष्टी एंजॉय करायचे.

मी आठवी नववीत असतांना पुन्हा महाभारत केबलवर बघायचा योग आला आणि तेव्हा मी त्यातील नाट्य खरोखरच समजु शकले. पुढे कॉलेजला असतांना लायब्ररीमधुन महाभारताचा पहिला खंड वाचायला आणला पण आमच्या मातोश्रींने ’घरात महाभारत वाचल की ते घरातसुध्दा घडत’ अस म्हणुन ते परत करायला लावल. तेव्हा ’शनिवारी नख नाही कापायचीत, रविवारी केस नाही धुवायचेत, जीन्स घालायची नाही, संध्याकाळी ७ च्या आत घरात हव’ अश्या काही किरकोळ आणि काहि महत्त्वाच्या विषयांवर लढा देण्यात मी माझी सर्व शक्ती वापरत होते. त्यामुळे महाभारतावरुन महाभारत न करता मी ते परत करुन माझी तेव्हाची आवडती लेखिका कुमुदिनी रांगणेकर ची पुस्तक आणलीत.

व्यासपर्व - दुर्गा भागवत
इतक्यात दुर्गा भागवतच व्यासपर्व वाचल. वाचण्याआधी थोड कचरत चालु केल कारण महाभारत खर घडल असेल तर ते घडुन १०,००० वर्ष होउन गेलीत आता कोणती व्यक्ती कशी होती, कोणाच कुठे चुकल वगैरे विचार करण्यापेक्षा फक्त त्यातील नाट्याचा आनंद उठवायचा. पुस्तक वाचायला सुरु केल्यावर मात्र सोडावल नाही, इन फॅक्ट संपल्यावर अस वाटल हे अजुन थोड मोठ हव होत. पुस्तक तुम्हाला नक्कीच आवडेल ह्यात यत्किंचीतही संशय नाही. महाभारत लहानपणापासुनच भारतीयांच्या नसानसात भिनल आहे. त्यातील साफल्य, वैफल्य, औदासिन्य, कर्ममयता, वेग-आवेग, तत्त्वद्यान, सौदर्य, उदारता, कारुण्य, द्वेष, क्वचित कामुकता, शोकक्रंदन, क्रौर्य, वीर्य, धैर्य ह्या सर्वांचे आपण चाहते आहोतच. लेखिकेने हे पुस्तक महाभारतातील उन्मत्त, गर्विष्ठ, नम्र, विरक्त, उदार इत्यादी अर्क पात्रांवर रचल आहे. व्यासाच्या जगावेगळ्या लिखाणशैलीचे तिने वर्णन केले आहे. लेखिकेची मराठी खुपच अलंकारीक आहे ती समजायला मला थोडा त्रास झाला. पण ऍट द सेम टाइम मराठी भाषेच सौदर्य जाणवल.

पुस्तक वाचुन बघा, मग तुम्ही पण म्हणाल ’हे अजुन थोड मोठ हव होत’.

4 comments:

Jay said...

पहिले 2 paras वचुन गम्मत वटली . .

असं सनातनी वातावरण एके काळी अमच्या घरी सुध्दा होतं...
सकळी अंघोळ न करता जर् स्वैंपकघरात गेलं तर मतोश्रींची खुप चिडचिड ऐकुन् घ्यावयास लागायची...

कालमानापरत्वे आधुनिकता आली आहे आणी आता आम्ही सुध्दा तसे राहिलो नाही..
"कोण होतास तु काय झालास तु" हे जुने मराठी गाणे आजकाल जरा जास्तच मार्मिक वाटु लागले आहे..

तर असो ..
पुस्तकाबद्दल छान लिहीले आहेस..

Dhananjay said...

'Vyaasparva' - One of my favs. if u r interested in reading more (and haven't read it), here is suggested (must)reads about Mahabharat in Marathi -
1. Yugantar - Iravati Karve
2. Vyasanche Mahabharat - Narahar Kurundkar
3. Parva - Bhairappa ( original kannada novel, marathi translation available)

आशा जोगळेकर said...

वाचलंय ना अन खूप आवडल ही .

Anonymous said...

aaj j pahil aani vachala kharach i cannot explain my feelings except these words