रंगांची उ ध ळ ण

Author: Rasika Mahabal / Labels: , , , , , , , ,



वॉटरकलरस कित्ती अनपेक्षित निकाल देणारे. पाण्याबरोबर मिसळून पेपरवर लावलेत की त्यांची चालच निराळी होते. ते कुठे जाऊन पसरतील काहीच सांगता येत नाही. म्हणुनच ते रंगवायला अवघड आणि पूर्ण झाल्यावर फलप्राप्तिची भावना देणारे.

अक्रेलिक - जिथे मारु तिथे बसतात आणि लगेच वाळून घट्ट होतात. एवढ सरळसोट त्यांच वागण तरीसुध्दा राजबिंडे दिसणारे. स्वतःकडे लक्ष आकर्षित करणारे.

ऑइल कलरस - थिक, दिवसेंदिवस वाळायच नाव घेत नाहित. दिसायला तर असतातच सुंदर पण त्याचबरोबर मला ते खुप ऍडजस्टिंग पण वाटतात, ते वाळेपर्यंत आणि वाळल्यावर सुध्दा त्याच्यावर पुटच्या पुट चढवू शकता.

चारकोल - जरा रस्टिक, गावराण दिसतात. थोडीशी ओबडधोबड गोष्टींची चित्र त्याला उठून दिसतात. रफ टेक्शर देऊन जाणारे हे स्मुथ रंग इतर चारकोल रंगांमधे मिक्स व्हायला चकार नकार देतात आणि प्रयत्न केला तर त्यांची नाराजी ते पेपरवर व्यक्त करतात.

जस प्रत्येक पेंटिंग प्रकाराच एक आगळेवेगळेपण आहे तसच प्रत्येक रंगाचसुध्दा आहे. प्रत्येक रंगाचे काही मित्र रंग असतात तर काही शत्रु. मित्र रंग एकमेकांच्या आजुबाजूला आलेत की एकदुसरयाच रुप अजुन निखारतात आणि शत्रु आजुबाजुला आलेत तर दुसरयाच दिसण तर खराब करतातच पण स्वतःचसुध्दा करतात.

एक चित्र सुंदर दिसण्याकरता निरनिराळे मित्र रंग आजुबाजुला येण गरजेच आहे. चित्रात नुसता एकच रंग असला तर निखार येत नाही. एकाच रंगांच्या वस्तुंनी व्यापलेल्या खोलीत प्रत्येक वस्तू स्वतःच अस्तित्त्व हरवते आणि आपल्या सारख्याच असणाऱ्या दुसऱ्या छटेत मिसळून जाते. अंगावर जर स्कायब्लू फ्रॉक आणि पायात फेंट पिवळे सॅंडल असतील तर दोघांच एक निराळ ठळक असणं असत.

कुठल्याही व्यक्तीचाच विचार करा ना. नुसतच कोणी का ब्लॅक ऍंड व्हाईट असतात? त्यांच्यात अनेक रंग असतात, त्या रंगांच्या विविध छटा वेगवेगळ्या वेळेस बाहेर येतात, कधी डार्क तर कधी फेंट.

आयुष्य ही रंगांची उधळण आहे, कुठल्याही रंगीबेरंगी चित्राहून ते कमी नाहीये. पांढरे डल क्षण आहेत म्हणून आपण निळ्या शांतदायी क्षणांना एंजॉय करतो, काळ्यासारख्या दुःखद घटना घडतात म्हणून आपण हिरव्या सुखाच्या घटकांची वाट बघतो.

कुठल्यातरी एकाच रंगाच माझ्या स्वभावावर अतिप्रभाव असू नये, कुठल्यातरी एकाच रंगाने माझ्या आयुष्याला रंगवू नये, काही घटना चारकोल सारख्या ओबडधोबड रस्टीक तर काही ऑईल सारख्या सुरेख आणि ऍडजस्टिंग, काही अक्रेलिक सारख्या रीलायबल ऍंड रिच तर काही वॉटरकलर सारखे बिनभरवशाचे आणि आव्हानात्मक दे अशी या दुनियेच्या किमयागार चित्रकाराकडे मी मागणी करते.

निसर्ग

Author: Rasika Mahabal / Labels: , , , ,



आपल्या मनाची जी परिस्थिती असते त्यावरुन आपल्याला निसर्गाची वेगवेगळी रुप आवडतात का? जस धबधब्याच कोसळणार रौद्र रुप बघून कधी मन शांत होत, त्याच ते रुप बघून डोळे भरुन येतात तर कधी त्याच तेच कोसळण भीषण वाटून मानसिक अशांती निर्माण करत.
कधी तळ्याची संथ चाल बघून एका प्रकारची अनामिक स्तब्धता मनास लाभते, झाडांच्या हिरव्या रंगाने प्रसन्नता मिळते तर कधी त्यांच्याकडे लक्षच जात नाही. हे निसर्गाच कॄर तर कधी निर्मळ स्वरुप आल्हाददायी तर कधी नैराश्यजनक का वाटाव?
नदीच खळखळणार पाणी - जे बघता येत पण त्यात मनसोक्त डुंबता येत नाही, हिरवेगार डोंगर दिसतात पण त्यावर लोळता येत नाही. निरभ्र निळ आकाश पण उडता येत नाही.
कधी जिवनाच्या 'हे सर्व का? कशासाठी' परिस्थितीतून जातांना अश्या कुठल्यातरी दैदिप्यमान निसर्गाच रुप दिसत आणि वाटत बर झाल मी आहे, हे सर्व खुप सुंदर आहे.

खडे आणि ओरखडे - द. मा. मिरासदार

Author: Rasika Mahabal / Labels: , ,





मिरासदारी सारख पुस्तक लिहिणारया मिरासदारांच हे पुस्तक खुपच बालीश वाटत. हे पुस्तक वाचतांना तुमच्या मेंदुला खडे आणी ओरखडे बसतात. मला नाही आवडले तुम्हाला आवडले तर बघा.

आहे मनोहर तरी ... सुनिता देशपांडे

Author: Rasika Mahabal / Labels: , ,


पु.ल. देशपांड्यांच्या बायकोचे पुस्तक म्हणुन मी हे वाचायला घेतले त्यामुळे लेखिकेचे लहानपणीचे घर कसे होते किंवा त्यांच्या घरची म्हैस कशी होती हे जाणुन घेण्यात मला काहीच इंटरेस्ट नव्हता. पु.लं बद्द्ल लिहिलेल्या नॉट सो गूड गोष्टींमुळे त्यांचे चाहते नक्कीच दुखावले जाणार. पुस्तकातुन लेखिकेच्या व्यक्तिमत्त्वाची चांगलीच ओळख घडुन येते. १९४२ पासुनचा त्यांचा स्वातंत्रसंग्रामात भाग, लीव्ह इन रीलेशनशिप्स असायला हव्या वगैरे त्यांचे विचार जाणुन त्यांचा जन्म चुकीच्या शतकात झाला अस वाटत. लेखिकेचा स्वभाव बघितला तर त्यांच लग्न कोणाशीही झाल तरी त्यांच्या वाट्याला आलेला एकटेपणा चुकला नसता अस मला वाटत. त्यांच्या पुस्तकाच नाव तरीदेखिल आहे मनोहर तरीच असत. त्यांच्या बरयाच गोष्टी मला टॅंन्जंट गेल्यात जस की दलित आणि स्त्रियांची केलेली कंपॅरिझन. त्यांनी पु.लंबद्दल लिहिलेल्या वाईट गोष्टिंमधल्या निम्म्याहुन अधिक गोष्टी नॉट इव्हन वर्थ मेंशनिंग वाटल्यात. मी सुधा मुर्तींचीसुध्दा बरीच पुस्तक वाचली आहेत पण त्यात कधीच त्या किती महान आहेत किंवा नवरा किती आळशी आहे असल काही वाचनात येत नाही, उलट त्यांच्या गोष्टींमधुन त्यांच भारदस्त आणि प्रगल्भ व्यक्तिमत्त्व हळुवार समोर येत.

पु.लं बद्दल अधिकाधिक वाचण्याच्या मोहातून मी पुस्तक सोडु शकले नाही. कदाचीत त्याच कारणाकरता किंवा मला न उमगलेल्या कुठल्यातरी कारणाकरता तुम्हाला हे पुस्तक नक्कीच आवडेल.

कॅफ़े and लाईफ

Author: Rasika Mahabal / Labels: , , ,



मी एका कॉफी शॉप मधल्या मोठ्या खिडकीसमोर बसले आहे. मला इथुन भल्या मोठ्या बिल्डींगस दिसत आहेत. त्यांच्यासमोर चार हात अंतर ठेउन राहणारी विभक्त कुटुंबासारखी झाड विखुरली आहेत. समोरच्याच बिल्डींगमधे जाड्या बायकांनी बारीक व्हायच सेंटर आहे, त्याकडे अधुनमधुन नजर टाकत मी होल मिल्क विथ व्हिप क्रिम असलेली कडु कॉफी पिते आहे. कॉफि पितांना जरी कडु लागली तरी ती गिळल्यावर एक मस्त चव जिभेवर घोळते ती थोडावेळ एंजॉय करायची आणि मग पुढचा सिप घ्यायचा.

आय एम नॉट डिपेंडंट ऑन एनी स्टिम्युलेटिंग एजंटस अस म्हणणारी मी कॉफीने येणार्या तरतरीची चाहती झाली आहे.
माझ्या उजव्या बाजुला एक जख्खड म्हातार जोडप त्यांची मॉर्नींग कॉफी घेत प्रेमाच्या गप्पा मारतांना भासतय तर त्यांच्या बाजुला एका पायाने अधु बाई तिच्या कुबड्या साईडला ठेऊन सोफ्यावर निवांत पाय पसरुन पुस्तक वाचत पडली आहे.

शेजारी असलेल्या सलॉनमधून चटक मटक चवळी चटक बायका टॉक टॉक करत जात आहेत. भवती संथ म्युझिक चाल्ल आहे. कोणी बस स्टॉपवर थंडीत काकडत बसची वाट बघत उभ आहे तर कोणी आपापल्या कामांना निघाल आहे. शनिवार रविवार नेमाने मी अस कॉफी पित पिपल ऑबझर्हेशन करते. हया सर्व लोकांकडे बघुन वाटत ह्यांच आयुष्य कस असेल?

कॉफीच्या कपवरच झाकण काढल्यावर आधी ते चाटून मग कॉफी पिणारया गोरया बाबाकडे बघितल्यावर वाटल जगात सर्वी लोक किती सेम असतात. कोणाला हॉट कॉफी आवडत असेल तर कोणाला कोल्ड एवढेच काय किरकोळ फरक.

इथे बसुन दरवेळेस मी हाच विचार करते की ह्या सर्वांमधे माझ वेगळेपण काय? माझ अस्तित्त्व काय? काहीच नाहीये!
कॉफी सारख हे एक कडु सत्य जे मनातही दिर्घ कडु चव देउन जात ते चघळत मग मी दिवसाच्या कामांना चालु लागते.

एवढस आभाळ

Author: Rasika Mahabal / Labels: , , , , , , ,


अशोक सराफ - लक्ष्मीकांत बेर्डे ह्या जोडगुळीचे सिनेमे बंद झालेत आणि मराठी सिनेमावर शोकाकुल परिस्थिती आली. सचिन पिळगांवकरने काढलेला एखाद दुसरा सिनेमा मधेच मराठी चित्रपटस्रुष्टीच अस्त्तित्त्व जाणवून जायचा आणि पुन्हा मग निस्तब्ध शांतता. कुठल्यातरी अजाण साखळदंडामधे मराठी दिग्दर्शक अडकलेला बहुतेक सराफ - बेर्डेच्या माकडचेष्टांनी भरलेल्या सिनेमां व्यतिरिक्त त्याला काहीच दिसत नव्हत आणि दिसल तरी मराठी प्रेक्षकाला ते झेपेल का नाही ह्याची भिती असावी. अशातच श्वास सारखा सिनेमा गुपचुप येतो काय व डायरेक्ट ऑस्करला पोचतो काय. मराठी दिग्दर्शक अचानक पछाडून जातो. त्याची झोपमोड झाली आहे हे तो डोंबिवली फास्ट, सरिवर सरी सारख्या सिनेमांमधुन सिध्द करतो.

पण आता मात्र माझ्या मते त्याची फक्त झोपमोड झालेली नसून संपुर्ण निद्रानाश झाला आहे. कदाचित,अनाहत, बनगरवाडी, वळु, चेकमेट, शेवरी, टिंग्या एकाहुन एक अधिक सुंदर सिनेमे...(चेकमेट मधील व्हिलनच नाव महाबळ - तेवढच एक वाईट :)) एकाहुन एक सुंदर नेपथ्य, दिग्दर्शन, अभिनय, संवाद.

आणि आता मात्र कमालच झाली - मराठी माणसाने एवढस आभाळ सारखा चित्रपट काढुन स्वतःभवतीची दोरखंड तोडून सुसाट पळ काढला आहे. हा सिनेमा अगदी नक्की बघाल. असेच अनेक मीनींगफ़ुल मराठी मुव्हीज निघत राहोत!

कालवा

Author: Rasika Mahabal / Labels: , ,


कसली ही तगमग कसली ही चढाओढ
दुसरयाला वाईट दाखवून स्वतःला वर ओढ
लोकांच्या वागण्यात काढायची सतत खोड
आपल्या कार्यातुन समर्थता दाखवणे नाही हा बोध

काहींच्या तोंडी सतत दुसरयाचे गाऱ्हाणे
एकाची पाठ फिरली की त्याला निंदेत नहाणे
दुसरयाचा मुर्खपणा म्हणुन आपण शहाणे?
स्वतःला हुशार ठरवायचे भलतेच हे बहाणे!

कोणाचे चांगले घडल्यास कौतुकात भिजवा
दुसरयाची प्रगती बघुन मनात मात्र जलवा
क्रोध, मत्सर, इर्षा, लोभ, लबाडीचा कालवा
कधी मीळायचा मनास निर्मळतेचा गारवा

दुसरयाचे कष्ट बनवा स्वतःचे भविष्य
तिसरयाची मेहेनत खपवा आपल्या नावावर अवश्य
समोरचा त्रासला तरी वागु असेच पुनःश्च
मनाच्या सुंदरतेतच नाही का सुंदर हे आयुष्य?