अशोक सराफ - लक्ष्मीकांत बेर्डे ह्या जोडगुळीचे सिनेमे बंद झालेत आणि मराठी सिनेमावर शोकाकुल परिस्थिती आली. सचिन पिळगांवकरने काढलेला एखाद दुसरा सिनेमा मधेच मराठी चित्रपटस्रुष्टीच अस्त्तित्त्व जाणवून जायचा आणि पुन्हा मग निस्तब्ध शांतता. कुठल्यातरी अजाण साखळदंडामधे मराठी दिग्दर्शक अडकलेला बहुतेक सराफ - बेर्डेच्या माकडचेष्टांनी भरलेल्या सिनेमां व्यतिरिक्त त्याला काहीच दिसत नव्हत आणि दिसल तरी मराठी प्रेक्षकाला ते झेपेल का नाही ह्याची भिती असावी. अशातच श्वास सारखा सिनेमा गुपचुप येतो काय व डायरेक्ट ऑस्करला पोचतो काय. मराठी दिग्दर्शक अचानक पछाडून जातो. त्याची झोपमोड झाली आहे हे तो डोंबिवली फास्ट, सरिवर सरी सारख्या सिनेमांमधुन सिध्द करतो.
पण आता मात्र माझ्या मते त्याची फक्त झोपमोड झालेली नसून संपुर्ण निद्रानाश झाला आहे. कदाचित,अनाहत, बनगरवाडी, वळु, चेकमेट, शेवरी, टिंग्या एकाहुन एक अधिक सुंदर सिनेमे...(चेकमेट मधील व्हिलनच नाव महाबळ - तेवढच एक वाईट :)) एकाहुन एक सुंदर नेपथ्य, दिग्दर्शन, अभिनय, संवाद.
आणि आता मात्र कमालच झाली - मराठी माणसाने एवढस आभाळ सारखा चित्रपट काढुन स्वतःभवतीची दोरखंड तोडून सुसाट पळ काढला आहे. हा सिनेमा अगदी नक्की बघाल. असेच अनेक मीनींगफ़ुल मराठी मुव्हीज निघत राहोत!
2 comments:
मी कोण, कुठला आणि तुज्या ब्लॉगपर्यंत कसा पोहचलो याचा वृतांत न देत बसता तू इत्थे मांडलेल्या मुदयाशी मी किती समरस आहे हे सांगणा मी जास्त गरजेचां समजतो. मराठी चित्रपट सृष्टीची मुहुर्तमेढ रोवनारे व्ही शांताराम, मास्टर विनायक, भालजी पेंढारकर अन् आचर्या अत्रे यांच्या मातीत उत्तम कला निर्मिती करणार्यांची अन् कलेवर अस्सीम प्रेम करणार्या कला रसिकांची कधीच वानवा नव्हती. गरज होती ते स्वतांच अस्स वेगळेपण ओळखून काहीतरी नावीन्यपूर्णया कला आविष्कार कला रसिकांसमोर सादर करणार्या धाडसी मनोव्रुतिचि. सुदैवाने हे प्रयोग करनारी पिढी आता कुठे मराठी मातीत खरा श्वास घ्याला सुरूवात करते आहे. मी ह्याला मराठी चित्रपट सृष्टीच्या संक्रमणाचा काळ मानतो. अशोक सराफ - लक्ष्मीकांत बेर्डे ह्यांच्या बद्दलचा तुज़या ब्लॉगमधला उल्लेख मनाला च्यूटपुट लावून जातो. ह्या दिग्गज कलाकारांच्या अदाकारिते बद्दल तुम्हा आम्हा पामरानी काही भाष्या करणे म्हणजे मुंग्यांनी मेरु पर्वत गिलण्या सारखा आहे. त्यांच्या कला गुणांना खरा न्याय देणारा एक ही दिग्दर्शक होऊ नये हे त्यांच अन् पर्यायाने आपलही दुर्दैव.
जाता जाता सुमित्रा भावे आणि सुनील सुखतनकर ह्या जोडगोळी बद्दल मी आवर्जून उल्लेख करीन. मराठी चित्रपट किती प्रघल्भ, प्रभावी आणी पुरोगामी अस्सु शकतात हे जाणीव करून देणार हे युगल. विषयाची मांडाणी,मुद्देसुद लेखन ,पात्रांची निवड आणि एका विशिष्ट्या विचार धारेला धरून चित्रपटाचा होणारा प्रवास ही ह्यांच्या चित्रपटांची खास वैशिट्या.
वेळ असेल आणि 3 तास सत्कार्णी लावायचे असतील तर ह्यातले काही चित्रपट आवर्जून पहा.
1) नितळ
2) वास्त्ूपुरुष
3) दहावी फ
4) दोघी
5) जिंदगी ज़िंदाबाद
वरच्याच्या यादीत.. आणखी काही अप्रतिम चित्रपटांची भर ः
"कदाचित"
"सनई चौघडे" (about single moms)
"वास्तुपुरूष" फारच जवळचा चित्रपट वाटला.. बऱ्याच गोष्टींशी आपला अतिशय जवळचा संबंध आहे असे वाटले..
मला मधल्या काळातले तमाशा प्रधान चित्रपट अजिबात अवडत नसायचे (आणी आजुनही अवडत नाहीत..)
ईथे तु "आमच्या लक्ष्याला " काही बोललेले आपल्याला अजिबात अवडले नाही..
अजुन "एवढसं आभाळ" पाहिलेला नाही पण नक्की पाहिन आता..
Post a Comment