जिवाच व्हेगस

Author: Rasika Mahabal / Labels: , ,


जशी लोक जिवाची मुंबई करतात तस मी मधे जिवाच व्हेगस केल. Land होतांना मी विमानातून बाहेर बघितल तर अतिशय रुक्ष आणि ओसाड जमिन दिसली. पण त्या भव्य सुकलेल्या प्रदेशात सुध्दा कमालीचे सौदर्य वाटले. New York च्या concrete jungle पेक्षा मला मला ह्या रुक्ष प्रदेशाने भुरळ घातली.

व्हेगस मध्ये गाडी rent करणे हेच सर्वात जास्त सोयीचे जाते. अक्षरश: १७$ दिवसाला पासून rates सुरु होतात. Slot machines ची सुरुवात विमानतळापासूनच होते आणि तेव्हापासूनच तुमच्या control ची परिक्षा सुरु होते. अर्थात ३-४ दिवसाचा stay control loose करायला more than enough आहे. गुरुवारी संध्याकाळी पोचून रात्री २ पर्यंत आम्ही casino explore केला. मी १ cent च्या machine वरुन गाडी काही हलवली नाही.

जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात गेले तरी माझा कोकण्स्थ स्वभाव काही जाणार नाही. कंजुषपणा त्यांच्या रक्तात हाडात मासात सर्विकडे भिनलेला असतो. १५-२० dollar जिंकल्याने माझ्या आतील कोकण्स्थ आत्म्याला फार कष्ट भोगावे लागले नाहीत आणी झोप पण शांत लागली : ).

शुक्रवारी सकाळी १० वाजता आमचा मोर्चा grand canyon कडे वळला. तिथे जायला साधारण ५ तास लागतात (considering traffic and lunch break). grand canyon बद्दल काहीही शब्दात express करण माझ्यासारख्या व्यक्तिला अशक्य आहे त्यामुळे मी तो व्यर्थ प्रयत्न पण नाही करत. तिथला sunset सर्वात सुंदर आहे. मावळतीच्या प्रकाशात grand canyon चे रंग अजून जास्त खुलतात.

मधे company meeting मध्ये as usual नविन लोकांना stage वर बोलावून आमचा CEO ragging करत होता. त्यात कोणाला तरी प्रश्न विचारला की तुला तुझ्याकडे कुठली super power असलेली आवडेल. त्याच त्याने काहीतरी random उत्तर दिल की ४ बाटल्यांहून अधिक दारु पिता येइल एवढा stamina पाहिजे की असलच काहीतरी. But that question really made me think की मला कुठली super power आवडेल? (अर्थात माझ्या नावातच super power आहे महा = super बळ = power)

मला time travel ची power आवडेल. मी past मध्ये जाऊन बघू शकेन की महाभारत खरच घडल का, घडल तर नेमक काय घडल, क्रूष्ण कसा होता;कसा दिसायचा. Probably महाभारत ही गोष्ट मला सर्वात जास्त fascinate करते. महाभारत ही संपूर्ण जशीच्या तशी घडलेली घटना नसून काल्पनिक असेल तर त्याच्या writer ला माझा साष्टांग नमस्कार... एवढी complicated आणि interesting गोष्ट one of the biggest and most interesting novels till today अस म्हणता येइल, त्याच्यापुढे harry potter वगैरे त्याच्या पायाची धूळ पण नाही.

विषयापासून जरा भटकंती झाली पण time travel ची शक्ती मिळाली तर मला grand canyon च्या इथे करोडो वर्षांपूर्वि काय होते कसे होते हे बघायला आवडेल. Grand canyon मधे मला अजून एक interesting गोष्ट अशी वाटली की तिथे krishna temple, vishnu, rama shrine आहेत. सर्व main points ना हिंदू नाव का आहेत हा प्रश्न मला भेडसावत आहे. Internet वर शोधायचा प्रयत्न केला पण काही concrete उत्तर नाही मिळाल. कोणाला माहित असल्यास मला नककी कळवा.

Hotel ला परत पोचायला बराच उशिर होउनसुध्दा casino मध्ये खेळण्याचा उत्साह सर्वांनाच होता. Saturday ला आम्ही सकाळी १० पासून सर्व casinos पालथे घातलेत. एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे Stratosphere hotel चा casino non-smoking नाहीये पण इतर almost सर्व casinos non-smoking आहेत. मला सर्वात जास्त Excalibur आवडला. रात्री आम्ही Hans Klok चा magic show बघितला. He is said to be world's fastest magician. मी बाहेर आल्यावर त्या show बद्दल विचार करण्याच टाळत आहे. कारण जेवढा जास्त विचार करते तेवढ जास्त confusion वाढत. मी जे बघितल ते खर होत का स्वप्न होत, खर होत तर हातचलाखी होती का खरी magic होती. After watching the show I can definitely say that he truly is world's fastest magician.

३-४ दिवसात सर्व लोक on an average ३ तास झोपले असतील. Sunday ला Blue man नावाचा show बघितला. Futurestic होता पण खुपच जास्त abstract वाटला. अर्थात depends on your choice पण मी कधी abstract art enjoy करत नाही, कदाचित ती मला कळत पण नाही, जी गोष्ट जशी आहे तशी दाखवता येते तर मग उगाच abstract कुठे करत बसा. मला show च्या मधे ५ मिनिटची डूलकी पण लागली. मला सिनेमाग्रुहांमध्ये झोपी जाण्याची वाईट सवय आहे. मी आत्तापर्यंत बऱ्याच सिनेमांना झोपी गेले आहे - उदाहरणार्थ Harry Potter, Casino Royale आणी most importantly एक खिलाडी एक हसिना, मी चकक फरदीन खानचा सिनेमा चालू असतांना झोपले म्हणजे दु:खद घटना आहे. Anyway इथल madam tuso museum, gondula ride एवढ काही खास नाहीये.

Vegas म्हणजे casinos दिव्यांचा लखलखाट, दुरुन बघितल तर दिव्यांचा समुद्र भासतो. आयुष्यात एकदा तरी नककी जिवाच व्हेगस करुन या.

Recent updates

Author: Rasika Mahabal / Labels: , , , ,

आज लिहायच ठरवल आणी ते पण मराठीतून. ह्र्स्व दिर्घच्या चूका माफ असाव्यात : )

ही गोष्ट तर सर्वांनाच माहीत आहे की आपले physical features आपल्याला आपल्या आई वडिलांकडून मिळतात आणि त्याबरोबरच काही behaviour patterns सुध्दा parents शी match करतात. त्याच धर्तीवर scientists ने काही interesting experiments केलेत. 


एक nurturing rat mother (say M1)जी की आपल्या पिल्लांची ख़ूप काळजी घेते आणि एक काळजी न घेणारी rat mother (say M2)जी की पिल्लांना जन्म देउन मोकळी होते. nurturing rat mother ची पिल्ल एकदम शांत आणि 'गुणी बाळ' :) होतात whereas दुसऱ्या rat mother ची पिल्ल त्यांना कोणी हातात घेतल की चावायला बघतात आणि cage मध्ये असलीत की scream करतात. Scientists ने M2 च एक पिल्लु M1 ला दिल तर ते एकदम शांत झाल आणि M1 च M2 ला दिलेल पिल्लु रागीट बनल. म्हणजे सर्वच behavior patterns genes मधून येत नाहीत तर बरेचसे nurturing वर सुध्दा अवलंबून असतात. 

एक sweden मधल village होत जिथे सारखा दुष्काळ पडायचा तर तिथले farmers दुष्काळाला खूप घाबरायचे, पण त्यांचे नातु पणतू ज्यांनी कि दुष्काळ कधीच experience केला नाही ते सुध्दा दुष्काळ ह्या नावाने घाबरतात... gene मधून famine ची fear सुध्दा pass on झाली. 

हे सर्व आणि अजून बरच काही Ghost in your genes ह्या documentary मध्ये बघून अस वाटल की आपल्याला आपल्या ancestors च्या genes मधून information, knowledge pass on होत असेल का? बऱ्याच वेळा आपल्याला एखाद्या ठिकाणी गेल की वाटत की अरे आपण इथे आधी कधीतरी येऊन गेलो आहोत ते त्यांच्यामुळे असेल का? तसच असाव अस मी hope करते म्हणजे आपल्या नंतर सुध्दा आपण मिळवलेल्या knowledge, experiences चा काहितरी फ़ायदा हॊऊ शकतो... नाही का? ही documentary नककी बघाल, कदाचित google videos मध्ये मिळून जाईल...

Recently IMAX मध्ये Sea Monsters आणि Dinosaurs Alive! 3D मध्ये बघितलेत. मला IMAX हा प्रकार भयंकर आवडतो... Harry Potter, Superman, सुध्दा 3D त बघायला मजा आली.

काही दिवसांपूर्वि आयुष्यात first time planetorium बघितले आणि पूण्यामध्ये अस काही का नाहिये ह्याची खंत वाटली. खरच आकाशात जाऊन भ्रमण केल्यासारखे वाटले. तिथे space वर documentary बघितली - हे एवढ मोठ विश्व - planets, stars, आपली galaxy बाहेरच्या galaxies हे सर्व कुठपर्यंत. ह्या सर्वाचा कुठे अंत आहे? आणि अंत आहे तर त्याच्यापलिकडे काय आहे? स्पेस मध्ये dead end चा concept funny वाटतो, हे विश्व अनंत आहे अस म्हणतात तेच खर असाव. ही documentary बघितल्यावर मी उगिचच विचार करत बसले की हे सर्व का आहे? मी इथे का आहे? मी काय करायला हव आहे? ह्याची निर्मिती कोणी केली असेल? 


फ़क्त earth वरच मनुष्यप्राणी आणी इतर प्राणिमात्र असतिल का अजुन कुठे असतिल आणी असतिल तर कसे असतिल etc. मला असे विचार करायला फारस आवडत नाही कारण आता ह्या जगात आले आहे तर उगीचच - का?कशाला असले प्रश्न विचारात का बसायच .. म्हणजे निर्मितिकाराने सुंदर जग बनवल आहे तर मग निर्मितिकारच कोण आहे का आहे कुठे आहे हे विचार करत बसण्यापेक्षा ह्या जगातल्या सर्व गोष्टींचा अनुभव घेण, त्या शिकण आणी एखाद्या प्रेक्षकाप्रमाणे अबब! केवढ हे सौदर्य... अशी reaction दयायची आणी मग त्या सौदर्याचा आस्वाद घ्यायचा निरनिराळ्या गोष्टींमधून ... हा approach मला जास्त आवडतो. जगात खूप गोष्टी आहेत करण्यासारख्या, शिकण्यासारख्या... आपण ०.२% जरि आत्मसात करु शकलोत तरि जन्म सार्थकी लागला म्हणायचा.

The DK geography of the world नावाचे पुस्तक वाचले, ह्याच्या प्रत्येक page वर वेगळ्या country चा description आहे (capital, population, famous things etc.), and it's full of pictures. त्यामुळे गेला एक महिना मला रोज वेगळा देश बघायचा मोह होत होता.

A history of Sanskrit literature, by A. Berriedale Keith पुस्तक वाचल. खूपच interesting वाटल. का कोणी Sanskrit सारखी language invent केली, एवढी complicated, difficult and full of rules आणी ते पण एवढ्या वषा॔पूर्वि. अस म्हणतात की Scholars and brahmins करता Sanskrit होती, मग इतर लोक काय बोलायचे? कोणते ग्रंथ Sanskrit मध्ये लिहिलेत, कोणी आणि का लिहिलेत त्यांच आता काय झाल? प्राक्रित language चा उद्भव का आणि कधी झाला अश्या भरपूर interesting गोष्टी आहेत book मध्ये. मिळाल्यास नककी वाचाल.

आत्तापर्यंत चारकोल पेंटिंग, ग्लास पेंटिंग, फ़ॅब्रिक; नीब; Oil paintings try केले होते पण पहिल्यांदाच watercolor painting चा class करत आहे. मला somehow हा प्रकार जास्त अवघड वाटला. मला ह्या teacher चा teaching approach आवडला, ती फक्त painting technique सांगते पण त्यापलिकडे काहीहि सांगत नाही; हा technique मध्ये काही चूक होत असेल तर सांगते. ह्यात सहि गोष्ट अशी होते की क्लास मधल्या २५ लोकांची २५ प्रकारची पेंटिंग होतात (सेम गोष्टीची म्हणजे for example प्रत्येक व्यक्तिने काढलेला apple वेगळा दिसतो)थोडक्यात प्रत्येक व्यक्तिच्या विचारांना, कल्पनांना, concepts ना व एक जो प्रत्येकाचा perspective असतो निरनिराळ्या वस्तुंकडे बघण्याचा त्याला ती freedom देते, त्याला तिच्या विचारांनी influence नाही करत.


Dance करायला तर मला नेहमीच आवडले आहे. पण तो कधी शिकला पाहिजे असे नाही वाटले, in fact माझी best friend engineering ला असतांना वेळ काढून भरतनाट्यम शिकायची तेव्हा मला वाटायच ewwww भरतनाट्यम वगैरे boring आहे. इथे आल्यावर मीच dance class लावला! शिकवणारी बाई नावावरून indian वाटली पण to my surprise she is a russian and now in the US since many years. I am the only indian student in the class and the class is always so crowded. She teaches kathak and is so graceful.


सहा- सात वर्षांपूर्वि सुध्दा मी Swimming शिकायचा attempt केला होता. पण class सुरु होऊन अख्खे तीन दिवस होऊन गेलेत आणी अजून ह्या मुलीला Swimming जमत नाही ह्या विचारांनी माझा instructor panic झाला. मग त्याने थोडा गावठी उपाय try केला - मला लागोपाठ दोन - तीन दिवस त्याने ८ फूट पाण्यामध्ये फेकून दिले. आता फेकून देऊन त्याचाच व्याप वाढायचा कारण मी काही हातपाय मारुन वर येऊ शकायचे नाही, त्यालाच उडी मारुन मला बाहेर काढावे लागायचे. त्यानंतर मी त्या class ला राम राम ठोकला. आता परत Swimming शिकण्याच सामर्थ जुटवल. इथली instructor मला आवडली. आरामात शिकवते, कुठल्याही गोष्टीसाठी pressurize करत नाही. त्यामूळे रोज १ तास Swimming practice करणे मी enjoy करत आहे.