एवढस आभाळ

Author: Rasika Mahabal / Labels: , , , , , , ,


अशोक सराफ - लक्ष्मीकांत बेर्डे ह्या जोडगुळीचे सिनेमे बंद झालेत आणि मराठी सिनेमावर शोकाकुल परिस्थिती आली. सचिन पिळगांवकरने काढलेला एखाद दुसरा सिनेमा मधेच मराठी चित्रपटस्रुष्टीच अस्त्तित्त्व जाणवून जायचा आणि पुन्हा मग निस्तब्ध शांतता. कुठल्यातरी अजाण साखळदंडामधे मराठी दिग्दर्शक अडकलेला बहुतेक सराफ - बेर्डेच्या माकडचेष्टांनी भरलेल्या सिनेमां व्यतिरिक्त त्याला काहीच दिसत नव्हत आणि दिसल तरी मराठी प्रेक्षकाला ते झेपेल का नाही ह्याची भिती असावी. अशातच श्वास सारखा सिनेमा गुपचुप येतो काय व डायरेक्ट ऑस्करला पोचतो काय. मराठी दिग्दर्शक अचानक पछाडून जातो. त्याची झोपमोड झाली आहे हे तो डोंबिवली फास्ट, सरिवर सरी सारख्या सिनेमांमधुन सिध्द करतो.

पण आता मात्र माझ्या मते त्याची फक्त झोपमोड झालेली नसून संपुर्ण निद्रानाश झाला आहे. कदाचित,अनाहत, बनगरवाडी, वळु, चेकमेट, शेवरी, टिंग्या एकाहुन एक अधिक सुंदर सिनेमे...(चेकमेट मधील व्हिलनच नाव महाबळ - तेवढच एक वाईट :)) एकाहुन एक सुंदर नेपथ्य, दिग्दर्शन, अभिनय, संवाद.

आणि आता मात्र कमालच झाली - मराठी माणसाने एवढस आभाळ सारखा चित्रपट काढुन स्वतःभवतीची दोरखंड तोडून सुसाट पळ काढला आहे. हा सिनेमा अगदी नक्की बघाल. असेच अनेक मीनींगफ़ुल मराठी मुव्हीज निघत राहोत!