कॅफ़े and लाईफ

Author: Rasika Mahabal / Labels: , , ,



मी एका कॉफी शॉप मधल्या मोठ्या खिडकीसमोर बसले आहे. मला इथुन भल्या मोठ्या बिल्डींगस दिसत आहेत. त्यांच्यासमोर चार हात अंतर ठेउन राहणारी विभक्त कुटुंबासारखी झाड विखुरली आहेत. समोरच्याच बिल्डींगमधे जाड्या बायकांनी बारीक व्हायच सेंटर आहे, त्याकडे अधुनमधुन नजर टाकत मी होल मिल्क विथ व्हिप क्रिम असलेली कडु कॉफी पिते आहे. कॉफि पितांना जरी कडु लागली तरी ती गिळल्यावर एक मस्त चव जिभेवर घोळते ती थोडावेळ एंजॉय करायची आणि मग पुढचा सिप घ्यायचा.

आय एम नॉट डिपेंडंट ऑन एनी स्टिम्युलेटिंग एजंटस अस म्हणणारी मी कॉफीने येणार्या तरतरीची चाहती झाली आहे.
माझ्या उजव्या बाजुला एक जख्खड म्हातार जोडप त्यांची मॉर्नींग कॉफी घेत प्रेमाच्या गप्पा मारतांना भासतय तर त्यांच्या बाजुला एका पायाने अधु बाई तिच्या कुबड्या साईडला ठेऊन सोफ्यावर निवांत पाय पसरुन पुस्तक वाचत पडली आहे.

शेजारी असलेल्या सलॉनमधून चटक मटक चवळी चटक बायका टॉक टॉक करत जात आहेत. भवती संथ म्युझिक चाल्ल आहे. कोणी बस स्टॉपवर थंडीत काकडत बसची वाट बघत उभ आहे तर कोणी आपापल्या कामांना निघाल आहे. शनिवार रविवार नेमाने मी अस कॉफी पित पिपल ऑबझर्हेशन करते. हया सर्व लोकांकडे बघुन वाटत ह्यांच आयुष्य कस असेल?

कॉफीच्या कपवरच झाकण काढल्यावर आधी ते चाटून मग कॉफी पिणारया गोरया बाबाकडे बघितल्यावर वाटल जगात सर्वी लोक किती सेम असतात. कोणाला हॉट कॉफी आवडत असेल तर कोणाला कोल्ड एवढेच काय किरकोळ फरक.

इथे बसुन दरवेळेस मी हाच विचार करते की ह्या सर्वांमधे माझ वेगळेपण काय? माझ अस्तित्त्व काय? काहीच नाहीये!
कॉफी सारख हे एक कडु सत्य जे मनातही दिर्घ कडु चव देउन जात ते चघळत मग मी दिवसाच्या कामांना चालु लागते.