अवकाश - सानिया

Author: Rasika Mahabal / Labels: , ,पूस्तकं वाचतांना नवे विचार गवसतात, नवी वाक्ये सापडतात, जीवनाचा अर्थ नव्याने जाणवतो. मग अश्यावेळी इतर कोणाशीच संवाद साधण नकोस वाटत, आपला आपल्याशीच संवाद सुरु असताना बाहेरील व्यत्यय नकोसा होत असतो. ही अस्वस्थता कसली असते? कथेमधे कधीतरी कोठेतरी आपल्याला आपणच सापडत असल्याची भावना की अगदी याच अश्याच परिस्थितीत आपण कसे वागलो असतो याची उत्सुकता? काही लेखक, लेखिका आपल्याला असेच झपाटुन टाकत असतात.

इतक्यात सानिया नावाच्या लेखिकेच अवकाश हे पूस्तक वाचल.

सानियाच्या लिखाणाची पध्दत मला आवडली. पूस्तक वाचतांना सोडवले नाही पण पूस्तक वाचून झाल्यावर असे वाटले की ही गोष्ट 'माहेरची साडी' वगैरे साचा मध्ये येते. ज्यात नारी ही दुर्बल आणि अतिशय सहनशील असा समाजाचा घटक दाखवतात... आणि ती तशी असल्याबद्द्ल तिला थोर म्हणवलेली असते. 'बंदिनी स्त्री ही बंदिनी, ह्रुदयी पान्हा नयनी पाणी जन्मोजन्मीची कहाणी!'...

जगातल्या कुठल्यातरी कोपरय़ात ते सत्य पण असेल ह्यात काही शंका नाही. पण सुरुवातीपासूनच जान्हवी धाडसी, महत्त्वाकांक्षी दाखवली आहे. ती अचानक आयुष्यातील दु:खांनी खचून जाते. जस की जान्हवी च्या भावाचा अकस्मात मृत्यू होतो आणि ह्या प्रसंगानंतर तिचे वडिल अंथरुण पकडतात आणि कोणाशी बोलत नाहीत, पण जान्हवी त्यांना बोलत करण्याचा किंवा माणसात आणण्याचा प्रयत्न पण करतांना दाखवलेली नाहीये.

ज़ान्हवीचे लग्न तिच्या मर्जीविरुध्द लावून देतांना सुध्दा ती पाहीजे तेवढा विरोध करत नाही. तिच्या मर्जीविरूध्द लग्न होत पण ह्यात तिच्या नवऱ्याचा काय दोश? त्याच आयुष्य का ती बरबाद करते. त्याच्यासुध्दा काही आशा, आकांक्षा असतील त्या लेखिकेने सोयिस्कररित्या दुर्लक्षीत करून जान्हवीला महान करार दिला आहे.

मनाविरुध्द गोष्टी घडत असतांना त्याच्यावर काही कृती करायची नाही आणी मग माझ नशिबच फूटक अस म्हणून रडत बसायच ह्याला काय अर्थ आहे. तिच्या आयुष्यातले प्रश्न एवढे मोठे नसतात की त्यांना ती सामोरी जाऊ शकली नसती पण उगीचच एकाच व्यक्तीच्या वाट्याला कशी जगातली सर्व दु:ख येतात आणि मग ती व्यक्ती बिच्चारी कशी खचून जाते अस वगैरे दाखवून उगीचच सहानुभुती मिळवण्याचा नाहक प्रयत्न केला आहे.

त्या प्रयत्नांना लेखिकेला सुरुवातीला यश पण मिळाल आहे, म्हणजे अगदी मला गळे काढून रडवण्यापर्यंत यश आल आहे :) पण काही वेळाने जान्हवीच so called bold and beautiful character माझ्या डोक्यात जाऊ लागल. अर्थात हे माझे विचार आहेत. मी जान्हवीशी relate करू शकले नाही, आम्ही दोघी अगदी विरुध्द व्यक्तिमत्वाच्या असल्याने असेल कदाचित. अर्थात ही कथा कुठल्या काळाची दाखवली आहे त्याला सुध्दा महत्त्व आहे. तो काळ बंड पूकरण्याचा नसेल कदाचित.

मला काही गोष्टी खटकल्या ह्याचा अर्थ तुम्हाला सुध्दा खटकतील असा होत नाही.

हे पूस्तक का वाचा?

त्यातील भाषेसाठी, लिखाणाच्या शैलीकरता. पूस्तक एकदम छोट आहे, त्यातील कथा खूप जलद गतीने पुढे जाते, प्रत्येक क्षणाला पुढे काय घडणार ही उत्सुकता कायम ठेवते, जीवनात येणारे काही प्रसंग, नाती लेखिकेने चांगली टिपली आहेत.

0 comments: