निसर्ग

Author: Rasika Mahabal / Labels: , , , ,आपल्या मनाची जी परिस्थिती असते त्यावरुन आपल्याला निसर्गाची वेगवेगळी रुप आवडतात का? जस धबधब्याच कोसळणार रौद्र रुप बघून कधी मन शांत होत, त्याच ते रुप बघून डोळे भरुन येतात तर कधी त्याच तेच कोसळण भीषण वाटून मानसिक अशांती निर्माण करत.
कधी तळ्याची संथ चाल बघून एका प्रकारची अनामिक स्तब्धता मनास लाभते, झाडांच्या हिरव्या रंगाने प्रसन्नता मिळते तर कधी त्यांच्याकडे लक्षच जात नाही. हे निसर्गाच कॄर तर कधी निर्मळ स्वरुप आल्हाददायी तर कधी नैराश्यजनक का वाटाव?
नदीच खळखळणार पाणी - जे बघता येत पण त्यात मनसोक्त डुंबता येत नाही, हिरवेगार डोंगर दिसतात पण त्यावर लोळता येत नाही. निरभ्र निळ आकाश पण उडता येत नाही.
कधी जिवनाच्या 'हे सर्व का? कशासाठी' परिस्थितीतून जातांना अश्या कुठल्यातरी दैदिप्यमान निसर्गाच रुप दिसत आणि वाटत बर झाल मी आहे, हे सर्व खुप सुंदर आहे.

1 comments:

मोगरा फुलला said...

हा अनुभव मीही घेतला आहे. एकच दृश्य परंतू मनाच्या निरनिराळ्या अवस्थेमुळे दृश्याकडे पाहण्याची दृष्टी बदलते. तुम्ही थोडक्यात पण सुंदर लिहिलं आहे.