दोन प्रवासी

Author: Rasika Mahabal / Labels: , ,



गोष्ट आहे दोन व्यक्तिंची
पहिला व दुसरा ही नावे त्यांची

त्यातील एक असे खुप महत्त्वाकांक्षी
आयुष्यातील छोट्या सुखांना तो त्याकरता बक्षी
दुसरा नसे यत्किंचीतही महत्त्वाकांक्षी
आनंद त्याचा वारा, समुद्र व त्यावरील पक्षी

मैत्री जमली दोघांची घनिष्ठ
बघु कोण होते त्यामधील कनिष्ठ

निघाले एक दिवस दोघे लक्ष घेऊन काशी
पहिल्यास होती ती गाठायची जरी राहिलेत ते उपाशी
दुसरयास येणारा प्रत्येक क्षण ठेवायचा होता मनाशी
एकच लक्ष पण विरुध्द व्यक्तिमत्त्वाचे हे दोन प्रवाशी

दुसरा आनंदे जेव्हा उमले कळी
किंवा कुठुनशी सरपटतांना दिसे अळी
आकाशी उठे निरनिराळ्या छटांची जाळी
पहिल्यास कळे ह्यातील धुंदी जेव्हा बघे तो दुसरयाच्या भाळी

नसे उरत दुसरयास वेळेचे भान
जिथे बघी तो फुले पाने किंवा रान
बस तिथेच मारी तो ठाण
नव्हती पहिल्यास ह्यातील काहीच जाण

पहिला म्हणी दुसरयास निघु इथुन लवकर
हे सर्व करण्यास पाहिजे तर येउ नंतर
काशी येण्यास पार करायचे आहे बरेच अंतर
ध्येयपुर्तीची मस्ती असते खुप चिरंतर

सारखाच घेत बसलो आपण जर विसावा
तर अंत नाही ह्या प्रवासा
स्वप्नपुर्तीची उन्मत्तता न येई तुझ्या निवासा
छोट्या गोष्टींतुनच मिळत असे तुला दिलासा

अजुन विचार करताय कोण होते श्रेष्ठ कोण होते कनिष्ठ?

पहिला एकटा असता तर भलेही गाठली असती त्याने गंगोत्री
दुसरा एकटाच बघत बसला असता रम्य रात्री
पहिला मुकला असता पण छोट्या सुखांस
आलीच नसती काशी दुसरयाच्या नशिबास

एकमेकांना पुरक होते हे दोन सोबती
एक दुसरयाच्या नादाने सर्वी सुख त्यांना लाभती
एकाच ध्येयाचे एकत्र हे प्रवासी
असतील तुमच्याही घरात असे दोन रहिवासी

1 comments:

Ashutosh said...

सुंदर विचार आहे. मला वाटतं ह्याचाशी मिळता-जुळता विचार अलकेमिस्ट पुस्तकात आहे.
त्यात एक उदाहरण दिलेलं आहे, एक मुलगा यशस्वी आणि ज्ञानी अशा व्यक्ती जवळ जातो आणि विचारतो, सुखी जीवनाचं रहस्य काय?
त्यावर तो ज्ञानी पुरुष उत्तरतो, आधी माझा राजवाडा पाहून ये पण जाताना एक चमचाभर तेल हातात घेऊन जा. तेल सांडू देऊ नकोस.
मुलगा परतल्यावर तो विचारतो, माझं ग्रंथालय पाहिलंस, बगीचा कसा वाटला, मुलगा म्हणाला की माझं लक्ष तेल सांभाळण्याकडे होतं.
तो ज्ञानी पुरुष म्हणाला आता जा आणि पुन्हा पाहून ये. मुलगा परत आला तेव्हा त्यानी कौतुकानी सर्व सांगितलं. पण चमच्यातलं तेल कधीच सांडून गेलं.
तो ज्ञानी पुरुष म्हणाला सुखी जीवनाचं रहस्य म्हणजे, सगळ्या सुंदर, अलौकिक गोष्टींचा अनुभव घेताना चमच्यातल्या तेलाचा विसर पडू न देणं.