भारतातील रिती, रुढी, रिवाज, परंपरा, प्रथा ह्यांच्या नावाखाली स्त्रीयांना सतत दुय्यम दर्जाची वागणूक दिली जाते. उदाहरण द्यायची झालित तर भरपूर आहेत.
कुठल्याही लग्नात होणारया विधी बघितल्यात तुम्ही? पुरुष सर्व प्रकारचे विधी करतात व बाई फक्त त्याच्या हाताला हात लावून support दर्शवते. आजकालच्या जमान्यात बायका घर दार सगळ चालवतात, त्यांचा रोल कर्त्या बाईचा असतो, जे काय आयुष्यात घडत ते एक एकमेकांच्या equal मदतीने घडत त्यामूळे निम्म्या विधींमधे पुरुषांनी हाताला हात लावून बसायला हरकत नाहीये. लग्न लावुन देणारया पुरुष पूजारयांच्या ते पचनी पडायचे नाही. एखाद गोष्ट नुसती रीत आहे म्हणून follow करत बसायच कारण?
जन्मल्यावर वडिलांचे व लग्नानंतर नवरयाचे नाव लावायची अजून एक प्रथा. ह्या परंपरेच्या नावाखाली पुरुषांना पुरुषप्रधान समाज ठेवण्याची सोय मिळाली आहे. आईच नाव कुठेच का येऊ नये? शेवटी जन्म द्यायच सर्वात अवघड काम एक नारीच करते. अर्थात ह्या बदलाकरता पुरुषांचा विरोधच असणार कारण तस घडल नाही तर त्यांच्या नाहक अहंकारास ठेच पोहोचेल.
लग्न झाल्यावर मुलगी आता दुसरया घरची झाली वगैरे संवाद मला बोसट आणि मागासलेले वाटतात. मुलीच एक घर असत व मुलाच एक. कोणी कोणाच्या घरी न जाता दोघांच मिळून एक घर बनवायच असत. आईवडिलांसोबत वर्षानूवर्षां पासूनचे धागे दोरे तोडुन मुली बाहेर पडतात, पुरुषांची मात्र साधी नाळ सुध्धा तुटू नये? एकमेकांच्या आई वडिलांची गरजेनुसार सेवाशुश्रुषा करावी. फक्त मुलगा असेल तरच म्हातारपणाची काठी बनतो हे disprove केल्याशिवाय मुलगी झाली म्हणून तिचा निर्घुण बळी दिला जाणार नाही.
बायांनो तुम्ही married असाल तर मंगळसुत्री, टिकल्या, जोडवी घाला, आम्ही मात्र बोंगाडे फिरतो. ह्या प्रथा झिडकवणारया बायकांची छीथू करण अर्थातच पुरुषांच्या फायद्याच आहे पण बायकांकडूनही त्यांचा धिक्कार होतो तेव्हा मला त्यांची कीव करावीशी वाटते. अश्या बायका कदाचित बाई म्हणून जन्मण हे स्वलांछ्न, कमीपणाच व बांधीलकीच काम समजतात.
एक एक दोन दोन वर्षांनी भारताबाहेर राहणारी जोडपी स्वकीयांसोबत वेळ घालवायला मायदेशी जातात. त्यात पुरुष सगळे दिवस स्वतःच्या घरी राहतात व मुलिंकडून ही अपेक्षा ठेवली जाते की त्या अर्धा अर्धा वेळ दोनीही घरी घालावतील. अशी बळजबरी करण्याच कारण? तुमच्या सारख्या त्याही त्यांच्या कुटूंबियांना भेटण्याकरता, त्यांच्यासोबत वेळ घालवण्याकरता व्याकूळ आहेत. त्यांनी त्यांच्या ईच्छांना ठेचून, स्वतःच मन मारुन का जगाव?
बायकांना त्यांनी दिलेल बलिदान, त्यांची ममता, सहनशीलता अशी काही अवजड विशेषण लावून मग घाऊक पुजल जात, ओळखल जात, एक स्त्री म्हणून जन्मदात्यांकडून ते जडवल; घडवल जात. ह्या सर्वात त्यासूध्धा तुमच्यासारख्याच एक भावनाप्रधान मानव आहेत हे का विसरल जात? एक पुरुष व बाई समाजातील स्वतंत्र्य व समर्थ घटक आहेत, त्यांना पदोपदी क्षणोक्षणी equal treatment मिळालीच पाहीजे व त्याकरता कोणीही स्वतःच्या साध्या भावनांचा बळी द्यायची गरज नाहीये.
1 comments:
tanx
Post a Comment