चिऊ आणि मी

Author: Rasika Mahabal / Labels: , , , , , ,


चिऊ... हे काय नाव झाल? चिऊ हे साधारण माझ्याच वयाच्या माझ्या भाचीच टोपणनाव आहे.
माझ्याच वयाची भाची हे कस शक्य आहे? माझ्या वडिलांच्या सर्वात मोठ्या बहिणीच्या सर्वात मोठ्या मुलीची ही सर्वात मोठी मुलगी.... हुश्श...

आम्ही दोघी एकाच शाळेत वेगवेगळ्या वर्गात होतो. मी शाळेत कुठेही दिसले की चिऊ ’मावशेशेशे’ अशी हाक मारायची. एक दिवस कोपऱ्यात घेऊन मी तिला सांगितल मला रसिका म्हण मावशी नको. त्याच अजूनही तिने आद्न्यापालन केल आहे.
भाची असली तरी एवढी वर्ष आम्ही खुप चांगल्या मैत्रिणी म्हणुनच राहिलो आहे. दुर्योधन आणि शकुनीमामानंतर घनिष्ठ मैत्री जमून कारस्थान करणारी आमचीच जोडगुळी असावी.

पुण्यातला फ़र्गसन रोड वर सागर आर्केडच्या कट्ट्याजवळ एक दिवस चिऊ दिसली. मी रस्त्याच्या दुसऱ्याबाजुला उभे होते. तिथून मी जोरात ओरडले ’चिऊऊऊऊ’. त्यानंतरच्या भेटीत तिने मला कोपऱ्यात घेऊन सांगितले की मला चिऊ नको म्हणत जाऊ माझ्या खऱ्या नावानेच हाक मारत जा; खास करुन कॅट मुलांसमोर. त्याच मी आजवर पालन केलेल नाही.
सुंदर मुलांना ती कॅट म्हणते, ती उपमा मला फ़ार आवडली नसली तरी मीसुध्दा स्मार्ट मुलांना कॅट म्हणू लागले आणि माझ्या सर्व मैत्रिणींमध्ये ती उपमा प्रसिध्द झाली. (वेड कॅट म्हणजे सौदर्याची सर्वात उच्च श्रेणी)

आम्ही दोघींनी मिळून एक गिटार क्लास लावला. आणि तो कुठल्यातरी तत्सम कारणास्तव मी सोडला. चिऊ जात राहिली. नंतर कधीतरी तिच्या गिटार क्लासमधील कॅट मुलांसोबत तिला बघून क्लास सोडल्याबद्दल माझा जीव हळहळला. ती आता फार सुंदर गिटार वाजवते.

चिऊने क्रुष्णमुर्ती पध्दतीने कुस्तीचा क्लास लावला आणि ८० किलो पर्यंत कोणालाही उचलू लागली. त्याच काळात भारताची पुढली मल्लेश्वरी बनण्याच्या प्रयत्नांत मी होते. कोणाचे बायसेप मोठे ह्यावर मग आमची स्पर्धा लागायची, ज्यात मी तिच्यासोबत कधीच जिंकू शकले नाही.

चिऊबद्दल अजून एक विशेष गोष्ट म्हणजे ती पूण्यात मोटरसायकल चालवायची. तिच्या मागे बसून फेरफटका मारायला मला जाम आवडायच. एक मोटरसायकल चालवणारी सुंदर मुलगी पाहून लोकांच्या मागे वळून वळून बघणाऱ्या अवाक नजरा मला रोमहर्षक वाटायच्यात. एकदा मी माझ्या मैत्रिणीसोबत सकाळी ८ ला बसची वाट बघत उभे होते. तेव्हा आमच्यासमोरुन टाईट जीन्स टॉप घालून एक मुलगी झुपकन मोटरसायकलवर निघून गेली. तिला बघुन मी म्हाताऱ्या आजीबाई सारखी कमेंट केली - ’आजकालच्या पोरी!’ ऩ क्षणार्धात माझ्या लक्षात आल अरे ही तर चिऊ होती.

आमच्या दोघींचे खुप इंटरेस्टस़ सारखे आहेत. जस की पेंटींग. तिच्या खोलीतल्या भिंतिंवर पण तिने निरनिराळे पेंटिंगस केले आहेते. म्हणजे तिला माझ्याहून जास्त एक पेंटिंगचा प्रकार येतो - वॉल पेंटिंग!
पेंटिंग, कॅलिग्रफी ह्या कलांमधे चिऊ नि्पुण आहे. ती गातेसुध्दा खुप सुंदर.
दोघींना वाचनाची भरपुर आवड त्यामुळे पुस्तक हा आमचा आवडीचा विषय.

सुट्टीच्या दिवशी रात्री एकामागुन एक ४-५ सिनेमे बघणे हा आमचा एक छंद. फर्गसन रोडवर बर्ड वॉचींग हा आमचा सर्वात आवडता छंद. प्रेमभंगापासुन ऑफिसमधल्या कटकटींपर्यंत आमच नॉनस्टॉप चर्चासत्र सुरु असायच.

न मिळवण्याजोगे असले तरी तिला सोनु निगम, राहुल द्रविड आणि मग ब्रायन ऍडमवर क्रश होते. होय, तिचा चॉइस वेळेसोबत सुधारत गेला. तिच्या इतर आवडी म्हणजे फोटोग्रॅफी आणि इंग्लिश गाणी ऐकणे. सायकॉलॉजिस्ट हे तिच प्रोफेशन आहे अन ती अस्खलित फ्रेंच बोलते. एकदा तरी आयुष्यात फ़्रान्सला जाऊन यायच हे तिच स्वप्न होत ते इतक्यातच पुर्ण झाल. मी तिचा आदर करते कारण ती एवढ्या सर्व कलागुणांमधून प्रविण आहे.

चिऊला इयत्ता आठवीपासून डायबिटिज आहे, तिला रोज साधारण ३ इंजेक्शनस घ्यावे लागतात. बऱ्याच रात्री हायपोमुळे तिला मी जागतांना बघितल आहे. पण ह्याबाबतीत मी तिला कधिच कुरकुर करतांना बघितल नाहीये, किंवा कुठली गोष्ट न करण्याकरता ह्याला कारण बनवतांना पण बघितल नाहिये. खर तर तिने एका तब्बेतीने हट्ट्याकट्ट्या मुलीहून अधिक गोष्टी शिकल्या असतील आणि त्यांच्याहून अधिक उत्साहात.

२ वर्षांपुर्वी चिऊच एका वेड कॅटसोबत लग्न झाल आणि लवकरच ती छोट्या कॅटस ना जन्म देणार आहे. तिला पुढील आयुष्य सुखाचे जावो!

3 comments:

Saleel said...

So has Chiu given birth to her cats??

प्रफ़ुल्ल पाटील said...

lekh far chhan aahet.
ek suggesion : blog ch background color badalala tar dolyacha tras kami hoil

Dhanwanti said...

खुप सुंदर लिखाण आहे रसिका तुमचे. आणि ब्लॉग सुद्धा खुपच उत्तमप्रकारे बनवलाय. आवडला. मलाही तुमच्यासारखीच एक माझ्याच वयाची मावशी आहे. तुमचा हां लेख वाचून तिची आणि आमची लहानपणीची मजा आठवली. छान वाटले.सुंदर आठवणी बऱ्याच दिवसानंतर चाळवल्या गेल्या.

- मनस्विनी